पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे वय ८९ वर्षे आहे.
मागील काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नव्हती. मात्र, बुधवारी (ता. १३) त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांना त्यांना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
प्रतिभा पाटील यांची देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळख आहे. २००७ ते २०१२ या काळात त्या राष्ट्रपती होत्या. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळात विविध मंत्रिमंडळ खाती सांभाळली होती आणि राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी अधिकृत पदे भूषवली होती. याशिवाय, त्या काही वर्षे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा होत्या.