Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलिसांची दमदार कामगिरी, शिंदवणे घाटात एकाला लुटणाऱ्या ५ दरोडेखोरांना २४ तासात अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 3 February 2024, 20:36
five people arrested by uruli kanchan for looting man in shindwane ghat

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटात वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केले आहे. शुक्रवारी (ता. ०२) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

अनिल हनुमंत जाधव (वय-२०), प्रवीण अनिल हावगोळ (वय-२२), विश्वास दयानंद जाधव (वय-१९), स्वप्निल विनोद देडे (वय -१९, रा. चौघेही, विडी घरकुल पवन नगर, सोलापूर), एकनाथ उर्फ रामेश्वर घोडके (वय २१, रा. निवडुंगे, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गणेश बाळासाहेब महाडिक (रा. सध्या सासवड मूळ रा. शिंदवणे, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटातून गणेश महाडिक हे शिंदवणे परिसराकडे त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. यावेळी रेल्वे ब्रिजखाली तीन अनोळखी इसमांनी लाईट दाखवून महाडिक यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाडिक न थांबता तसेच पुढे निघून गेले.

यावेळी महाडिक यांच्या मोटारसायकलचा वेग हा शिंदवणे घाटातील वळणावर कमी झाला. वेग कमी झाल्यानंतर दोन अनोळखी इसमांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली व पँन्टच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याचवेळी घाटातून वाघापूर बाजूने उरुळी कांचनकडे एक ट्रक निघाला होता. या ट्रकचालकाने महाडिक यांना मारहाण करताना पाहिले व ट्रक थांबवली. त्यानंतर सदर पाचही आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात महाडिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, सदर घटनेचा तपास उरुळी कांचन पोलीस करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना या गुन्ह्यातील आरोपी हे उरुळी कांचन परिसरात लपले असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता फरार दोन आरोपींनाही पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुद्देमालांसह ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, पोलीस हवालदार रणजीत निकम, सोमनाथ सुपेकर, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड त्यांच्या पथकाने केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

A Lucknow court on Monday convicted the notorious serial killer, cannibal and skull collector Raja Kolander

‘तो माणसांच्या मेंदूपासून बनवलेले सूप प्यायचा’, घरामध्ये १४ मानवी कवट्या सापडल्या… जाणून घ्या २५ वर्षांनंतर शिक्षा होणाऱ्या सिरीयल किलर राजा कलंदरची कहाणी

Wednesday, 21 May 2025, 17:31

सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण ; मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Wednesday, 21 May 2025, 17:18

पुणे: अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी मौलानाला अटक

Wednesday, 21 May 2025, 17:15

“जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” – राजेश पांडे

Wednesday, 21 May 2025, 16:57

वैष्णवी हगवणेंचा मन सुन्न करणारा पोस्टमार्टम रिपोर्ट ; सासरच्यांनी मारहाण केल्याचा अंदाज

Wednesday, 21 May 2025, 16:44

मुंबईनंतर पुणेकरांनाही आता घेता येणार लोकलचा आनंद, प्रकल्पाचे काम लवकरच होणार सुरू

Wednesday, 21 May 2025, 16:42
Next Post
Harshavardhan Patil appointed as NCDC member by central co-operative ministry

हर्षवर्धन पाटील यांची एनसीडीसीवर निवड, केंद्रीय सहकार मंत्रालयाने काढली अधिसूचना

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.