MLA Rahul Kul : पुणे : दौंड तालुक्यातील पाच ठिकाणांचा समावेश प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत झाला आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील कामांचा प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत समावेश होऊन त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार अॅड. राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, सध्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार हा निधी उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, यापूर्वी दौंड तालुक्यातील गोपीनाथ मंदिर (वरवंड), तुकाई मंदिर (पारगाव), खंडोबा मंदिर (देलवडी), महादेव मंदिर (राहू) आदी कामांसाठी निधी उपलब्ध झाला होता. आता दौंडच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
मंजूर कामे व निधी
– केडगाव येथील पद्मावती मंदिर परिसराची सुधारणा करणे : १ कोटी
– पिंपळगाव येथील सिध्देश्वर मंदिर परिसराची सुधारणा करणे : १ कोटी
– शिरापूर येथील श्री राम मंदिर परिसराचा पर्यटन विकास करणे : १ कोटी
– कुसेगाव येथील भानोबा देवालय परिसर सुशोभिकरण करणे : १ कोटी
– पाटस येथील तलावाचे सुशोभिकरण करणे : १ कोटी
आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. पुन्हा एकदा दौंड तालुक्यातील नवीन पाच ठिकाणांचा विकास या माध्यमातून होणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी या वेळी दिली.