थेऊर, ता. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य व आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे यांच्या पुढाकाराने थेऊर (ता. हवेली) गावात सोमवारी (ता.14) प्रथमच “जनता दरबार” चे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णय क्रमांक संक्रीण/2025/प्र/क्र. 978 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
या दरबारामध्ये जात प्रमाणपत्रांसाठी नावनोंदणी, त्रुटी दुरुस्त्या, नवीन अर्ज स्वीकारणे, तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित कामकाज, कृषी, ऊर्जा (MSEB), सामाजिक न्याय व महिला बालकल्याण, आरोग्य इ. विभागांमार्फत मार्गदर्शन व सेवासुविधा देण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व संविधान पुस्तिकेच्या पूजनाने करण्यात आली. या जनता दरबाराचा सुमारे 297 नागरिकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. मंडळ अधिकारी किशोर जाधव, तलाठी सरला पाटील, ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पाटील, MSEB चे कनिष्ठ अभियंता सुधीर धाडगे, कृषी अधिकारी गजानन नारकर, कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर यांनी उपस्थित नागरिकांना माहिती देत विशेष सहकार्य केले.
यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, तसेच काळूराम कांबळे, यशवंतचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, सदस्य राहुल कांबळे, गणेश रसाळ, सुखराज कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, गोविंद तारु, संजय गावडे, विनोद माळी, मच्छिंद्र तारु, गणेश कुंजीर, नंदकुमार कुंजीर, लक्ष्मण कुंजीर, रूपचंद बोडके, रामचंद्र बोडके, मयुर कुंजीर, दिनेश कुंजीर, दिपक काकडे, संदीप काकडे, विलास काकडे, बाळासाहेब शेडगे, सचिन राऊत, किरण मेमाणे, रामदास चव्हाण, रायचंद जाधव, वसंत चव्हाण, सोमनाथ जाधव, सुमित सावंत, अजय जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.