Fire News | पुणे: टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला…
अद्याप सुरु असून शेजारील चार घरांना ही आगीची झळ; जवानांनी प्रथमत आग वस्तीमधे व शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने व सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
जखमी वा कोणतीही जिवितहानी नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणेमनपा- पुणेकॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल आहेत.
पुण्यात भवानी पेठ येथील टिंबर मार्केट प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लाकडाच्या ऊतम वस्तु मिळतात. रोज या ठिकाणी मोठी उलाढाल होत असते. या ठिकाणी अनेक गोदामे असून या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी आपला लाकडाचा माल साठवून ठेवला आहे.
दरम्यान, आज सकाळी ४.१४ वाजता येथील रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती पुणे अग्निशामक दलाला मिळाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shivshahi Bus Caught Fire : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ‘शिवशाही’ने अचानक घेतला पेट
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या