पिंपरी: गावठी दारु निर्मिती करणाऱ्या एका महिलेवर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी 29 जानेवारीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली. याप्रकरणी संबंधीत महिलेविरोधात शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही बेकायदेशीरपणे गावठी दारु बनवत होती. यावेळी पोलिसांनी छापा टाकून तिच्याकडून 6 लाख रुपयांचे 6 हजार लिटर दारु निर्मीतीचे रसायन जप्त करण्यात आले आहे. याचा पुढील तपास शिरगाव परंदवाडी पोलीस करत आहेत.