शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या दारु अड्ड्यांवर शिरुर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकून कारवाई करीत हजारोंचा दारुसाठा जप्त केला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाळासाहेब रघुनाथ घुमे (वय ४९ रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर), चंद्रशेखर दादाभाऊ घोलप (वय २९ रा. टाकळी भीमा ता. शिरुर जि. पुणे), अक्षता अमोल सातकर (वय २९ रा. दहिवडी ता. शिरुर), संतोष सर्जेराव पट्टेकर (वय ३६ सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. गितानगर औरंगाबाद जि. औरंगाबाद), रोहन अंकुश डफळ (वय ३६ रा. धामारी ता. शिरुर), लकवीरसिंग जगन्नाथ सिंग (वय ४१ सध्या रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. विलनूरपुर खुर्द ता. आंनदपूस साहेब जि. रुपनगर राज्य पंजाब), सुरेश गणपत कांगुणे (वय ५८ रा. पिंपळे जगताप ता. शिरुर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी बेकायादेशीपणे देशी विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गायवाड, वेरणनाथ मुत्तनवार, पो.हवा. संदीप जगदाळे, प्रशांत गायकवाड, संतोष मारकड, विनायक मोहिते, प्रशांत म्हस्के, दिनेश कुंभार, महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर, अश्विनी दिवटे यांचे पथक तयार करुन तळेगाव ढमढेरे येथे हॉटेल जयमल्हार, निमगाव म्हाळुंगी येथे हॉटेल नयनतारा, दहिवडी येथे हॉटेल आण्णाई, सणसवाडी येथे दोस्ती बियरबार जवळ, जातेगाव खुर्द येथे हॉटेल, ढाबा येथे छापे टाकत कारवाई करुन सुमारे अठरा हजार रुपये किमतीचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.