लोणी काळभोर (पुणे): लोणी काळभोरमधील एका तरुणाने सणसवाडी येथील महिलेला लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर विशाल शिंदे (वय 26, रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीशी पटत नसल्याने पीडित महिला मुलीसह तिच्या आईकडे सणसवाडी येथे राहण्यास आहे. 05 जून 2023 रोजी फिर्यादी महिला ही लोणीकाळभोर येथे मामाकडे राहण्यास गेली होती. त्यावेळी विशाल शिंदे हा तिच्या मामाच्या घरी काही कामानिमीत्त येत जात होता. त्यावेळी त्याच्यासोबत महिलेची चांगली मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यांनतर मोबाईलवरच त्यांचे बोलणे व्हायचे. नंतर फिर्यादी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या आईकडे रहाण्यासाठी आल्या.
6 नोव्हेंबर रोजी 2023 रोजी विशाल शिंदे याला समजले की, त्या सनसवाडी येथे आल्या आहेत. त्यानंतर शिंदे हा सनसवाडी येथे आला होला, त्यावेळी फिर्यादी यांची आई घरी नव्हती. तो फिर्यादीला भेटला व म्हणाला, ”तु मला खुप आवडते. मी तुझ्याशी लग्न करेल, तुला मी आयुष्यभर सांभाळेल. माझी बायको मला आवडत नाही. आपण हॉटेलवर जाऊन तिथे बोलू”. त्यानंतर शिंदे याने फिर्यादी महिलेला शिक्रापूर येथे एका लॉजवर घेऊन जात बळजबरीने व इच्छेविरुध्द शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तो लोणीकाळभोर येथे निघुन आला.
नंतर फिर्यादी यांनी वारंवार शिंदे याला कॉल केला असता त्याने कॉल रिसीव्ह करत नव्हता. त्याला पोलिसांकडे तक्रार करेल असे सांगीतले असता, त्याने फिर्यादीला तुझे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टला टाकला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर आधिक तपास करत आहेत.