Pune News :पुणे – ‘महावितरण’ने वीजेचे कनेक्शन दिल्यानंतर आता सोलापूर बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. १० जूनपर्यंत काम पूर्ण करून तत्काळ सोलापूर-पुणे या मार्गावर पहिल्या टप्प्यात १० इलेक्ट्रिक बस धावतील. ही माहिती विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली. (Finally Solapur-Pune electric bus! Ticket price same as Shivshahi; Tender for 5150 buses in the state)
पुणे-नगर, पुणे-मुंबई यासह इतर काही मार्गांवर सद्य:स्थितीत ७० इलेक्ट्रिक बस धावत आहेत. याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्यात येत आहेत. (Solapur News) इंधनावरील कोट्यवधींचा खर्च कमी करून व प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविली जाणार आहे.
आता सोलापूर विभागानेही महामंडळाकडे सोलापूरसाठी ७५ इलेक्ट्रिक बसगाड्या द्याव्यात, असा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला आहे. पंढरपूर व मंगळवेढ्यासाठी प्रत्येकी २५ तर सोलापूरसाठी २५ बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यात नोंदविण्यात आल्या आहेत. विभाग नियंत्रक भालेराव यांनी त्यासंबंधीची माहिती दिली.
सोलापूर डेपोतील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर पंढरपूर येथील चार्जिंग स्टेशनचे काम सुरु केले जाणार आहे. (Solapur News) त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा, मंगळवेढा-पंढरपूर, पंढरपूर-पुणे, मंगळवेढा-पुणे अशी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात ५१५० बसची निविदा
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता पाच हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्या येणार आहेत. सध्या १५० बसगाड्या तयार करण्याचे काम सुरु असून त्यातील ७० गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. (Solapur News) या गाड्यांचा तिकीट दर शिवशाही बसप्रमाणेच असणार आहे. बसगाड्यांची गुणवत्ता एकदम दर्जेदार आरामदायी आहे.
महावितरणने वीज कनेक्शन दिल्यानंतर आता सोलापूर बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरु आहे. काही दिवसांत काम पूर्ण होईल, अशी आशा आहे. जून महिन्यात सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याचा मानस आहे. महामंडळाकडे सोलापूरसाठी २५ बसगाड्या मागितल्या असून पहिल्यांदा दहा गाड्या धावतील, असे नियोजन आहे. त्यानंतर उर्वरित गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.
– विनोद भालेराव, विभाग नियंत्रक, सोलापूर
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!
Solapur News : मराठा समाजाची प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी!