सागर जगदाळे
भिगवण : खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनामुळे स्वामी चिंचोली भागातील पोटचारीच्या माध्यमातून बंधाऱ्यात पाणी आले असून, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे या भागातील भविष्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. सद्या या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज होती.
स्वामी चिंचोली येथील ओढ्याला पाणी आल्याने ओढ्यावरील सर्व बंधारे भरून वाहत आहेत. बंधारे वाहत असल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. पाणी आल्यामुळे पिकांचे नुकसान टळणार आहे, असे तेथील शेतकरी दादासाहेब धुमाळ म्हणाले. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब मदने, संतोष मदने, आबासाहेब ननवरे, अविनाश मोहिते, सागर तोरडमल, आकाश मोहिते, सागर आबनावे, अमित वेताळ यांनी आमदार राहुल कुल यांच्या कार्याचे कौतुक केले.