Festival News | पुणे : गुढीपाडवा सणाला अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यानिमित्ताने साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी मार्केटयार्ड, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मंडईसह इतर बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
विविध रंगांच्या गाठींसह ड्रायफ्रूट गाठींना मागणी…
विविध रंगांतील गाठींसह ड्रायफ्रूट असलेल्या साखर गाठी अन् विविध प्रकारांतील गाठींना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.गुढीपाडव्यानिमित्त बाजारात लाल, पिवळा, नारंगी अन् पांढऱ्या रंगांच्या साखरेच्या गाठींसह ड्रायफ्रुटच्या आकर्षक गाठींनी दुकाने सजली आहेत.
एक गाठ २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर आर्कषक ड्रायफ्रुटच्या गाठीच्या दर १०० ते २०० पर्यंत लांबीनुसार विक्री केली जात आहे. लहान आर्कषक दिसणाऱ्या गुड्यांच्या खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून, १०० ते २०० पर्यंत आकारानुसार गुढी विक्री केली जात आहे.
या तयार गुढ्यांचा कार आणि घरात पूजेसाठी वापर करीत आहेत.पूजेचे साहित्य, गाठी, गुढी खरेदीसाठी महिलांची मंडई, मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे
Warje News | वारजे परिसरातील न्यू अहिरे सोसायटीतील बिबट्या अखेर दोन तासांनी जेरबंद