राजेंद्र शेळके
Farm News : नारायणगाव, (पुणे) : महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत २५ जून ते ०१ जुलै हा कृषी संजीवनी सप्ताह दरवर्षी साजरा करण्यात येतो. या मोहिमे अंतर्गत रविवारी (ता. २५) निमगीरी (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर घेऊन उत्साहात सुरुवात करण्यात आली. (Farm News)
यावेळी तालुका कृषी अधिकारी हरीश माकर, मंडळ कृषी अधिकारी तानाजी देशमुख, कृषी सहाय्यक अमोल मोरे, प्रगतशील शेतकरी अर्जुन घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी हरीश माकर यांनी शेतकऱ्यांना कृषी पीक तंत्रज्ञान व प्रसाद या विषयावर मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांचे उद्भवणारे प्रश्न जाणून घेतले.
मंडळ कृषी अधिकारी तानाजी देशमुख यांनी चार सूत्र पद्धतीने भात लागवड आणि त्यामुळे होणारे फायदे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहायक अमोल मोरे यांनी कृषी विभागाच्या नवीन नवीन योजनांचे मार्गदर्शन केले. (Farm News)
दरम्यान, प्रगतशील शेतकरी अर्जुन घोडे यांनी यांञिक पद्धतीने कमी खर्चाची एकजुटीने शेती करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. यावेळी निमगिरी गावचे सुदाम भालिंगे, भाऊ साबळे, पंकज घायतडके, रामदास रढे, प्रशांत शेळके, विठ्ठल साबळे, सुनील उंडे, तर खटकाळे गावचे रामदास झाडे, विलास मोरे, प्रकाश भवारी व उंडेखडक गावचे बाळू कवटे, अनिल कवटे, गोपाळ मुंढे व ग्रामस्थ उपस्थित होते. (Farm News)