पुणे : पुण्याच्या ईवायई (Ernst & Young (EY) या नामांकित अकाऊंटिंग कंपनीमध्ये 26 वर्षीय महिला कर्मचारीचा ‘कामाच्या ताणतणावामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबाने केला आहे. कंपनीकडून कामाचा प्रचंड दबाव टाकण्यात आल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला, असा दावा पीडित तरुणीच्या आईने केला आहे.
एना सेबेस्टियन पेरायील असं मृत पावलेल्या तरुणींच नाव असून ती पेशाने सीए होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एना सेबेस्टियन पेरायील ही कामावर रूजू झाल्यानंतर 4 महिन्यातच तिला कामामुळे सारं असहय्य झालं होतं. दरम्यान या तरूणीच्या आईने अनिता ऑगस्टीनने कंपनी भारतचे बॉस राजीव मेमानी यांना यांसंबधीत एक इमेल लिहिला आहे. मुलीला खूप जास्त काम दिलं जात होतं. तिच्यावर कामाचा ताण होता, असा दावा ऑगस्टीन यांनी या पत्राद्वारे केला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत ऑगस्टीन यांनी कंपनीवर टीका केली आहे.
सध्या आई अनिता ऑगस्टीनने यांचा इमेल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु, याबाबत ईवायई कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.
एना पेरायील 2023 मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि मार्च 2024 ईवाई पुणे या कंपनीत सहभागी झाली. पेरायीलची ही पहिली नोकरी होती. ती आनंदीत होती कारण तिला नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाली होती.पण अवघ्या चार महिन्यानंतर एनाच्या मृत्यूची बातमी कळताच माझा संसार उध्वस्त झाला. सर्वात दु:खाची गोष्ट म्हणजे कंपनीतील कोणीही तिच्या अंत्यसंस्कारालाही आले नाही.
तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कामामुळे तिला निद्रानाश, ताण, बैचेनी जाणवत होती. मात्र अशा परिस्थितीमध्येही तिने काम रेटलं होतं. यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटी महत्त्वाची असल्याची समजूत तिने करून घेतली होती. परंतु कामाच्या ताणतणावामुळे तरुणीचा मृत्यू झाला.
Heartbreaking news from EY Pune – a young CA succumbed to the work pressure and nobody from EY even attended her funeral – this is so appalling and nasty!!! pic.twitter.com/pt8ThUKiNR
— Malavika Rao (@kaay_rao) September 17, 2024