युनूस तांबोळी
शिरूर : ‘मुलाने इंग्रजी फाडफाड बोलावं’…!अशी सगळ्याच पालकांची इच्छा असते.म्हणूनच की काय मुलाच्या इंग्रजीकडे जरा लक्ष द्या असे एका पालकाने शिक्षकाला सांगितले. वर्गात त्या मुलाला उभे करून शिक्षकाने ‘इलेक्ट्रिसिटी’ या शब्दाचा उच्चार करण्यास सांगितला. मात्र मुलगा ‘इलेक्ट्रिटीटी’ असे उच्चारन करत होता. जवळपास एक तास झाला तरी त्यात काही बदल झाला नाही.
त्याच्या त्या बोलण्यामुळे शिक्षक देखील आता ‘इलेक्ट्रिटिटी’ असेच उच्चारू लागला होता.
संध्याकाळी ही सर्व कहानी त्याने त्याच्या वडीलांना सांगितली. अहो तुमचा मुलगा’इलेक्ट्रिसिटी’ ला ‘इलेक्ट्रिटीटी’ असेच म्हणतो.
असेच उच्चारन राहिल्यावर आम्ही शिक्षकांनी तरी काय करायचे. असेच तो शिक्षक त्या वडीलांना सांगता होता. त्यावेळी शिक्षकाचे
सर्व बोलणे ऐकून घेऊन वडील देखील शिक्षकाला हळूवार म्हणाले की, सर, काय करणार मुलाची देखील तेवढीच ‘कॅपेटीटी’ असेल तर तुम्ही तर काय करणार म्हणा. त्यावर शिक्षकाला आश्चर्याचा धक्काच बसला. घरातूनच मुलांना अज्ञानाचे धडे मिळत असतील. तर मात्र शिक्षकांने शिकवायचेच कसे.
दुसऱ्याच सकाळी घरासमोर आजोबा बसले होते. या शिक्षकाने राम राम घातला. मुलगा ‘इलेक्ट्रिसिटी’ ला ‘इलेक्ट्रिटीटी’ म्हणतो. तर
वडील ‘कॅपेसिटी’ ला ‘कॅपेटीटी’ म्हणतात. मग शिक्षकाने शिकवायचे कसे ? त्यावर आजोबा हळूवार म्हणाले की, सर कृपया याची कुठे ‘पब्लिटीटी’ करू नका. असेच सांगितले. त्यावर मात्र टिटी ची मात्रा या घराला लागू पडली की काय ? असा सवाल शिक्षकाच्या मनात निर्माण झाला.
दरम्यान, डॅा. संजय कळमकर यांच्या या व्याख्यानातील शिक्षकाला पिंपरखेड येथील माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून हशा मिळाला. पण शिक्षणासाठी शाळेत सर व मॅडम तर घरात आई वडीलांचे लक्ष गरजेचे असल्याचे पुढे आले.