लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या हवेली तालुका अध्यक्षपदी सचिन हंगरगे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे जिल्हा शिक्षक समितीचे विद्यमान कार्याध्यक्ष व जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब लांघी यांच्या निरीक्षणाखाली शनिवारी (ता. 24) हवेली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप आप्पा जगताप, जिल्हा शिक्षक समितीचे माजी सरचिटणीस राजेश ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष राक्षे, आंबेगावचे प्रसिद्धीप्रमुख सचिन अस्वले, जिल्हा पतसंस्था संचालक, राजेंद्र जाधव, शिरूर तालुका अध्यक्ष शरद धोत्रे, संचालक मोहन कोलते, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे, माजी अध्यक्ष श्रीकृष्ण उत्पात व तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारिणीचा जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान, शिक्षक समिती हवेली नूतन कार्यकारिणीत सरचिटणीसपदी गणेश सटाले, तालुका नेतेबापू तावरे, महिला अध्यक्षा मनीषा देशमुख, महिला आघाडी सरचिटणीस रंजना पंधें यांची बिनविरोध निवड करण्यात आली.