जीवन सोनवणे
भोर, ता.४ : पुणे उप जिल्हाप्रमुखपदी भोर तालुक्यातील भोंगवली येथील गणेश निगडे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वीय सहाय्यक नचिकेत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
निगडे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यानंतर भोर तालुक्यात या काळात त्यांनी तालुक्यात पक्ष वाढीसाठी मेळावे घेऊन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शासनाने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम केले, शिंदे गट शिवसेनेचा विस्तार वाढवण्यासाठी दोन्ही तालुक्यात काम केले याची दखल घेऊन वरिष्ठांनी पुणे जिल्हा कार्यक्षेत्राच्या उप जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. या निवडीनंतर निगडे यांनी सांगितले की, उप जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी वरिष्ठांनी दिल्याने पदाधिकाऱ्यांसोबत काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक नचिकेत खरात, पुणे शहर संपर्कप्रमुख अविनाश राऊत, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख अमित पाटिल, युवती कार्यकारणी सदस्या शर्वरी गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, महिला आघाडी जिल्हा संघटिका कांता पांढरे, नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, उपजिल्हाप्रमुख संतोष तोंडे, मुळशी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक करंजावणे, महिला आघाडी तालुका संघटिका सविता कुंभार, शिवसेना महिला आघाडी नेत्या सुदर्शना त्रिगुणाईत, उपतालुकाप्रमुख विकास खैरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.