हनुमंत चिकणे
Election | उरुळी कांचन, (पुणे) : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून गणल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीसाठी १९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” च्या माध्यमातुन तर “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” मध्ये निवडणुकीची सरळ लढत होणार आहे.
पूर्व हवेलीतील अनेक मातब्बर नेत्यांना तिकिटे न दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या काही उमेदवारांपैकी काहीजण मागील दोन महिन्यापासून राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केलेल्या दौऱ्यात नसतानाही त्यांना तिकिटे दिली गेली आहेत. तर काहीजणांनी उन्हातान्हात मागील दोन महिन्यांत झालेल्या प्रत्येक बैठकीला तसेच गावभेट दौऱ्यात हजेरी लावली होती. तरीही पक्षाने तिकिटे कापल्याने पूर्व हवेलीत नाराजीचा सूर उमटला आहे.
ग्रामपंचायत गटातून हि उमेदवारी मिळाली नसल्याने पॅनेलवर प्रचंड नाराजी…
पूर्व हवेलीत अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळण्याची स्वप्न पहिली होती. ग्रामपंचायत गटातून हि उमेदवारी मिळाली नसल्याने पॅनेलवर प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत. काहीजण पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात हजार न राहता पक्षाने काहीजणांना त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी दिल्या आहेत. त्यामुळे नाराज उमेदवारांनी आपला मोर्चा हा तिसरी आघाडीकडे वळवला आहे. त्याबाबतच्या बैठकांना वेग आला असून ऐनवेळी नव्याने आलेल्या उमेदवारांनी तिसरी आघाडी स्थापन केली तर या निवडणुकीत मोठा बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये काय बदल होतात हे दिसून येणार आहे.
दरम्यान, सहकारात किंग मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्ल्यात आपल्याच लोकांशी लढावे लागणार आहे. त्यामुळे हवेली बाजार समितीमुळे पूर्व हवेलीतील वातारवण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी धो धो पावसासारखे अर्ज दाखल करण्यात आले होते. इच्छुकांनी अनेक फिल्डिंग लावून उमेदवारी पदरात पाडून घेतल्याचे आरोप काही उमेदवार करू लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नवे राजकीय गट उदयास येणार यात काडीमात्र शंका नाही. व राजकारणात नवा आयाम देणारी बाजार समितीची निवडणूक ठरणार आहे.
याबाबत बोलताना जितेंद्र बडेकर म्हणाले, “राष्ट्रवादीचा पॅनेलच्या विरोधात मतदान करणार आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भाजपात असलेल्या उमेद्वाराडून पैसे घेऊन राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय नुसत्या सतरंज्या उचलायचे काम करायचे का. मला उमेदवारीसाठी पैसे मागितले होते मी पैसे दिले नाहीत म्हणून माझी उमेदवारी कट केली आहे. त्यामुळे अख्खा पॅनेल पडण्यासाठी काम करणार तसेच तिसरी आघाडी करण्यसाठी प्रयत्न करणार असून यापुढची भूमिका लवकरच जाहीर करणार.”
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, “पूर्व हवेलीतून सोरतापवाडी, कोरेगाव, उरुळी कांचनसह परिसरातील ग्रामपंचायत आहेत येथील हक्काचे लोकमतदान आहे. सोलापूर रोडला पक्षाच्या प्रत्येक बैठकीला हजर होतो. मात्र जे कधी बैठकीला हजर नव्हते अशांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला विश्वासात न घेता आम्हाला नाकारले यांचे फार मोठे दु:ख आहे. ज्याला ग्रामपंचायतीच्या मतदानाचा अधिकार नाही अशांनाहि उमेदवारी दिली आहे.”
याबाबत बोलताना पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी म्हणाले, “निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी सोडून धनदांडग्याना उमेदवारी दिली आहे. सोरतापवाडी नायगाव पेठ मधून कोणालाही उमेदवारी दिली नाही. सोरतापवाडी येथील चौधरी हे सहकारातील जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र हे पद फक्त नामधारी राहिले आहे. त्यांना पक्षाने विचारात घेतले नाही. जर जिल्हाध्यक्षांनाच विचारले नसेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय. त्यामुळे बैठक आयोजित करून तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरु करणार आहे.”
याबाबत बोलताना हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर म्हणाले, “इच्छुकांची संख्या मोठी होती. सर्वच इच्छुक उमेदवारात निवडणूक लढवण्याची पात्रता होती. परंतु मतांचा व भौगोलिक विस्तार पाहून हि उमेदवारी रचना करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व कारखाना व इतर येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच विचार करण्यात येणार आहे. सर्वच उमेदवारांची पात्रता त्यामुळे कोणीही नाराज न होता पक्षाला सहकार्य करावे. निश्चितपणे पुढील निवडणुकीसाठी विचार करण्यात येणार आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ajit Pawar | दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक