Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election | हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राष्ट्रवादीत बंडखोरी होणार ? उमेदवारांना पैसे देऊन तिकीट दिल्याचे आरोप, तिसरी आघाडी शक्य..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 April 2023, 15:20

हनुमंत चिकणे

Election |  उरुळी कांचन, (पुणे) : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून गणल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीसाठी १९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” च्या माध्यमातुन तर “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” मध्ये निवडणुकीची सरळ लढत होणार आहे.

पूर्व हवेलीतील अनेक मातब्बर नेत्यांना तिकिटे न दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या काही उमेदवारांपैकी काहीजण मागील दोन महिन्यापासून राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केलेल्या दौऱ्यात नसतानाही त्यांना तिकिटे दिली गेली आहेत. तर काहीजणांनी उन्हातान्हात मागील दोन महिन्यांत झालेल्या प्रत्येक बैठकीला तसेच गावभेट दौऱ्यात हजेरी लावली होती. तरीही पक्षाने तिकिटे कापल्याने पूर्व हवेलीत नाराजीचा सूर उमटला आहे.

 

ग्रामपंचायत गटातून हि उमेदवारी मिळाली नसल्याने पॅनेलवर प्रचंड नाराजी…

पूर्व हवेलीत अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळण्याची स्वप्न पहिली होती. ग्रामपंचायत गटातून हि उमेदवारी मिळाली नसल्याने पॅनेलवर प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत. काहीजण पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात हजार न राहता पक्षाने काहीजणांना त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी दिल्या आहेत. त्यामुळे नाराज उमेदवारांनी आपला मोर्चा हा तिसरी आघाडीकडे वळवला आहे. त्याबाबतच्या बैठकांना वेग आला असून ऐनवेळी नव्याने आलेल्या उमेदवारांनी तिसरी आघाडी स्थापन केली तर या निवडणुकीत मोठा बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये काय बदल होतात हे दिसून येणार आहे.

दरम्यान, सहकारात किंग मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्ल्यात आपल्याच लोकांशी लढावे लागणार आहे. त्यामुळे हवेली बाजार समितीमुळे पूर्व हवेलीतील वातारवण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी धो धो पावसासारखे अर्ज दाखल करण्यात आले होते. इच्छुकांनी अनेक फिल्डिंग लावून उमेदवारी पदरात पाडून घेतल्याचे आरोप काही उमेदवार करू लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नवे राजकीय गट उदयास येणार यात काडीमात्र शंका नाही. व राजकारणात नवा आयाम देणारी बाजार समितीची निवडणूक ठरणार आहे.

याबाबत बोलताना जितेंद्र बडेकर म्हणाले, “राष्ट्रवादीचा पॅनेलच्या विरोधात मतदान करणार आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भाजपात असलेल्या उमेद्वाराडून पैसे घेऊन राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय नुसत्या सतरंज्या उचलायचे काम करायचे का. मला उमेदवारीसाठी पैसे मागितले होते मी पैसे दिले नाहीत म्हणून माझी उमेदवारी कट केली आहे. त्यामुळे अख्खा पॅनेल पडण्यासाठी काम करणार तसेच तिसरी आघाडी करण्यसाठी प्रयत्न करणार असून यापुढची भूमिका लवकरच जाहीर करणार.”

 

याबाबत बोलताना उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, “पूर्व हवेलीतून सोरतापवाडी, कोरेगाव, उरुळी कांचनसह परिसरातील ग्रामपंचायत आहेत येथील हक्काचे लोकमतदान आहे. सोलापूर रोडला पक्षाच्या प्रत्येक बैठकीला हजर होतो. मात्र जे कधी बैठकीला हजर नव्हते अशांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला विश्वासात न घेता आम्हाला नाकारले यांचे फार मोठे दु:ख आहे. ज्याला ग्रामपंचायतीच्या मतदानाचा अधिकार नाही अशांनाहि उमेदवारी दिली आहे.”

 

याबाबत बोलताना पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी म्हणाले, “निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी सोडून धनदांडग्याना उमेदवारी दिली आहे. सोरतापवाडी नायगाव पेठ मधून कोणालाही उमेदवारी दिली नाही. सोरतापवाडी येथील चौधरी हे सहकारातील जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र हे पद फक्त नामधारी राहिले आहे. त्यांना पक्षाने विचारात घेतले नाही. जर जिल्हाध्यक्षांनाच विचारले नसेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय. त्यामुळे बैठक आयोजित करून तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरु करणार आहे.”

 

याबाबत बोलताना हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर म्हणाले, “इच्छुकांची संख्या मोठी होती. सर्वच इच्छुक उमेदवारात निवडणूक लढवण्याची पात्रता होती. परंतु मतांचा व भौगोलिक विस्तार पाहून हि उमेदवारी रचना करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व कारखाना व इतर येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच विचार करण्यात येणार आहे. सर्वच उमेदवारांची पात्रता त्यामुळे कोणीही नाराज न होता पक्षाला सहकार्य करावे. निश्चितपणे पुढील निवडणुकीसाठी विचार करण्यात येणार आहे.”

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Uruli Kanchan : सहा महिन्यांपासून बंद असलेले थेऊर- नायगाव- उरुळी कांचन रस्त्याचे काम अखेर सुरु ; उरुळी कांचन येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश..!

Ajit Pawar | दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक

Pune News : महिलेच्या अवयवदानाने तिघांना मिळाले जीवनदान ; ब्रेन डेड झाल्यावर नातेवाईकांनी घेतला निर्णय

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

Khed News : दबा धरून बसलेल्या बिबट्याचा ६ वर्षीय मुलीवर हल्ला ; आंबेगाव परिसरातील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.