दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी Election १४ जागांसाठी ३४ उमेदवार नामनिर्देशन अर्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जे.पी.गावडे यांनी दिली.
जे.पी.गावडे म्हणाले..!
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक घोषित झाली. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत नामनिर्देशित दाखल करण्याची मुदत होती. शेवटच्या दिवसापर्यंत १५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननी मध्ये दहा उमेदवारी अर्ज बाद झाले. १८ जागांपैकी ग्रामपंचायत अनुसूचित जाती /जमाती मतदारसंघातून यशवंत तात्या माने, व्यापारी अडती मतदार संघातून दशरथ नंदू पोळ, रौनक किरण बोरा, हमाल तोलार मतदारसंघातून सुभाष ज्ञानदेव दिवसे असे चार जण बिनविरोध निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली.
उर्वरित १४ जागांसाठी १४२ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. गुरुवार दिनांक २० एप्रिल उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. १०८ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्यामुळे फक्त ३४ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.
शेतकरी विकास पॅनल कांतीलाल शिवाजी झगडे, भाऊसाहेब तुकाराम सपकळ पॅनल प्रमुख
मतदार संघ निहाय उमेदवारांची नांवे
कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघ –
आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे, विलास सर्जेराव माने, दत्तात्रय सखाराम फडतरे, संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर, रोहित वसंत मोहोळकर,मनोहर महिपती ढुके, संदीप चित्तरंजन पाटील
कृषी पतसंस्था महिला – रुपाली संतोष वाबळे, मंगल गणेशकुमार झगडे
कृषी पतसंस्था वि.जा.भ.ज. – आबा गणपत देवकाते,
कृषी पतसंस्था इतर मागासवर्ग – तुषार देवराज जाधव.
ग्रामपंचायत सर्वसाधारण – मधुकर विठोबा भरणे, संतोष नामदेव गायकवाड.
ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -अनिल बबन बागल
ग्रामपंचायत अ.जा.ज. – यशवंत विठ्ठल माने (बिनविरोध)
आडते / व्यापारी – दशरथ नंदु पोळ (बिनविरोध), रौनक किरण बोरा(बिनविरोध)
हमाल मापारी – दिवसे सुभाष ज्ञानदेव (बिनविरोध)
स्वाभिमानी शेतकरी पॅनल प्रमुख डॉ. शशिकांत तरंगे, अशोक घोगरे.
मतदार संघ निहाय उमेदवारांची नावे – कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघ – अशोकराव शंकरराव घोगरे, महारुद्र शिवदास पाटील, सुभाष अर्जुन जगताप, तानाजीराव कृष्णराव निंबाळकर, उल्हास वसंतराव जाचक, विलासराव पंढरीनाथ घोळवे, संपत भीमराव पतसंस्था महिला – सुप्रिया कैलास कोळेकर, नर्मदा विलास पवार,
कृषी पतसंस्था वि.जा.भ.ज. – देविदास तात्याबा भोंग.
कृषी पतसंस्था इतर मागासवर्ग – बाळासाहेब सोपान चितळकर.
ग्रामपंचायत सर्वसाधारण – सुभाष किसन गायकवाड धोंडिबा माणिक थोरात.
ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – तानाजी नवनाथ नरुटे
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आप्पासाहेब जगदाळे आणि आमदार दत्तात्रय भरणे एकत्र आलेले आहेत.शेतकरी विकास पॅनल उभारला आहे तर दुसऱ्या बाजूला महारुद्र पाटील, अशोक घोगरे आणि शशिकांत तरंगे यांनी एकत्र येऊन स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल उभा केलेला आहे.
या निवडणुकीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभारलेला नाही.