Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Eknath Shinde: ‘मी डायरेक्ट कॅबिनेट मंत्री झालो, माझ्या पोराने नगरसेवक व्हावं’; शिंदेंच्या शिलेदाराचा सुपुत्र उतरणार पुण्याच्या राजकारणात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 October 2025, 18:13
Eknath Shinde: 'I became a direct cabinet minister, my son should become a corporator'; Shinde's Shiledar's son will enter Pune politics

Photo-Social Media

पुणे: येणाऱ्या काही महिन्यांत (Eknath Shinde) होऊ घातलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत (Local Bodies Election) मोठमोठ्या नेत्यांची (Tanhaji Sawant) प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः आपल्या पक्षाचा झेंडा पुणे महापालिकेवर फडकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे.

मात्र, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाने पुणे महापालिका निवडणूक लढवावी अशी सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे धाराशिवचे सावंत आता पुण्याच्या राजकारणात झळकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आज पुण्यात झालेल्या एका आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले. त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तानाजी सावंत म्हणाले, “हे आता काळ ठरवेल, हे आम्ही नाही तर जनता ठरवणार आहे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, तो वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. धाराशिवच्या राजकारणातील वजन इथे प्रतिबिंबित होईल की नाही हे कोणताही नेता ठरवत नाही, ते जनता ठरवते.”

यावेळी सावंतांना विचारले गेले की, एक पिता म्हणून आपल्या मुलाने महापालिका निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आहे का? त्यावर त्यांनी उत्तर दिले, “एक पिता म्हणून माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असे वाटते. माझ्या जीवनात नगरसेवक असा टप्पा आला नाही. परमेश्वराच्या कृपेने थेट आमदार झालो आणि त्यानंतर थेट मंत्री झालो. 8 वर्षांच्या राजकीय कार्यकाळात मी 4 वर्षे मंत्री होतो आणि तेही कॅबिनेट मंत्री. त्यामुळे महाराष्ट्राला दिलेल्या योगदानानंतर आता माझा मुलगा पुण्याच्या राजकारणात काम करेल अशी अपेक्षा आहे.”

 

या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, स्थानिक शिवसेना नेत्यांकडून सावंतांच्या मुलाला हिरवा कंदील मिळेल का, तसेच स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीला कितपत स्वीकार मिळणार, यावरून नव्या संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10
Next Post
Pune Crime: Two absconding accused in the 'that' assault case in Kadamwakvasti arrested

Pune Crime: कदमवाकवस्ती येथील 'त्या' मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp