Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 11 September 2026, 18:31

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारातील बदलांमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव दिसून आला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, आगामी काळात याच दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

येत्या सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढत्या मागणीचा परिणाम दरांवर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव १ लाख ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडू शकतो. त्याचबरोबर चांदीचा दरही ३ लाख रुपये प्रति किलोच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, भारतीय ग्राहकांकडून सोन्याची मागणी पुढील काळातही मजबूत राहण्याची शक्यता आहे. भारतात सोने खरेदीला परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व असल्याने बाजारातील सध्याची घसरण ही तात्पुरती ठरू शकते, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सोन्याचा दर १ लाख ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर ऑक्टोबरपासून तेजीला आणखी वेग मिळण्याची शक्यता असून, वर्षअखेरीस दर १ लाख ८० हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

Popley Groupचे संचालक राजीव पोपले यांच्या मते, सध्याच्या दरातील घसरण ही ग्राहकांसाठी खरेदीची संधी ठरू शकते. किरकोळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार ‘गोल्ड एक्सचेंज’च्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सण आणि लग्नसराईमुळे सोन्या-चांदीची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने किमतींनाही आधार मिळू शकतो.

 

दरम्यान, MCXवरील हालचाली पाहता अल्पावधीत सोन्या-चांदीच्या दरात दबाव दिसून आला आहे. मागील काही दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ४ टक्के, तर चांदीच्या दरात २ टक्क्यांची घसरण झाली. तीन महिन्यांच्या कालावधीत सोनं सुमारे ३ टक्के आणि चांदी ८ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नेमकं किती दिवस दारूबंदी? हायकोर्टाच्या संतापानंतर प्रशासनाला मोठा दणका; ब्लँकेट बॅन उठवला

Friday, 11 September 2026, 19:19

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21
Next Post

पुण्यात नेमकं किती दिवस दारूबंदी? हायकोर्टाच्या संतापानंतर प्रशासनाला मोठा दणका; ब्लँकेट बॅन उठवला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp