उरुळी कांचन, (पुणे) : निवडणूक म्हटली की, कोट्यावधी रुपयांपर्यत उमेदवाराला खर्च करावा लागतो. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणूकीपर्यंत पैशांशिवाय निवडणूक लढवता येत नाही. असेच चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, पूर्व हवेलीतील काही तरुणांनी एकत्र येत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी शिरूर-हवेलीची विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी लोकवर्गणीतून जवळपास 5 लाख रुपये जमा केले आहेत.
विधानसभेची निवडणूक शिरूर -हवेली मतदारसंघातून निवडणुक लढवावी, असा आग्रह पूर्व हवेलीतील तरुणांनी ज्ञानेश्वर आबा कटके यांच्याकडे केला आहे. पूर्व हवेलीतील विष्णू किसन चौधरी, राकेश बबन चौधरी, बापुसो बबन चौधरी, सोमनाथ कटके, अक्षय चौधरी, सुजित हाके, सौरभ चौधरी, प्रतिक चौधरी या युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन कटके यांनी विधानसभा लढवावी, यासाठी लोकवर्गणीचा 5 लाखांचा धनादेश देऊन शेवटपर्यंत साथ देण्याचे आश्वासन दिले आहे.
पेठ (ता. हवेली) येथील सुरज युवा प्रतिष्ठान आयोजित पेठ गाव नवरात्र फेस्टिवलचे अयोजन गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. यावेळी फेस्टिवलचे उद्घाटन माऊली आबा कटके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली.
“धनशक्ती विरुद्ध जनशक्ती” अशी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. माऊली आबा यांना जो संस्कारसंपन्न सार्वजनिक जीवनात वारसा आहे. तो वारसा आता शिरूर-हवेली मतदारसंघात पुन्हा नव्या ताकदीने उभा करून त्यांना लोकसेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवावे, असा आग्रह जनतेतून होत आहे. माऊली आबांना उमेदवारी दिली, तर शिरूर-हवेली मतदारसंघात जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी केला आहे.”
दरम्यान, गेल्या आठ दिवसांमध्ये फेस्टिवलचे अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. उद्योजक योगेश चौधरी यांच्याकडून अभिजीत जाधव यांचा गाण्याचा कार्यक्रम, दिपक चौधरी यांनी कबीर महाराज अत्तार यांचे किर्तन, बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव यांच्याकडून गणेश शिंदे यांचे व्याख्यान, उद्योजक सुजित चौधरी व पेठच्या सरपंच पल्लवी चौधरी यांच्याकडून शेवटच्या दिवशी जुही शेरकर यांचा महाराष्ट्र भर गाजलेला ऑर्केस्ट्रा, सुरज युवा प्रतिष्ठानकडून महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, युवा प्रतिष्ठान, सुजित चौधरी यांच्या सौजन्याने सातव्या माळेला मोफत ढोल ताशा पथक सेवा आयोजित करण्यात आली होती. सुरज युवा प्रतिष्ठानमार्फत गरजूंना मदत व गावातील विकासकामे करण्यात मोठे यश मिळाले आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी, माजी सरपंच सुरज चौधरी, रघुनाथ चौधरी, बापुसो चौधरी, उद्योजक सुजित चौधरी, प्रताप कांचन, उद्योजक गुलाब चौधरी, सरपंच पल्लवी सुजित चौधरी, पुणे जिल्हा भाजप महिला अध्यक्ष पुनम चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, उद्योजक अमोल चौधरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामदास चौधरी, उपाध्यक्ष आकाश आढाव, मारूती बरकडे, उपसरपंच काळुराम चौधरी, बाबुराव गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष सौरभ चौधरी, उपाध्यक्ष प्रतिक चौधरी, विष्णू चौधरी, राकेश चौधरी, माजी उपसरपंच सचिन हाके, सदस्य शोभा चौधरी, लक्ष्मी गायकवाड, तुषार चौधरी, समाधान अवचट, सर्व मंडळाचे मार्गदर्शक सदस्य व ग्रामस्थ महिला मेठ्या संख्येने उपस्थित होते.