Dr. Nilam Gorhe News : पुणे : पुण्यनगरीमध्ये आलेल्या संतांच्या मांदियाळीमध्ये आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “वारकऱ्यांच्या सहवासातील माऊलींचे आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनाचा अपूर्व आणि पवित्र योग आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक लाखो भाविक श्रद्धेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. यामुळे गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक वैभवशाली ठरली आहे. समानतेचा आणि एकतेचा संदेश देणारी वारी ही सामाजिक स्वास्थ्य घडवणारी अनोखी शक्ती आहे.
सर्व समाजातील घटकांना समृध्दी आणि प्रगतीची संधी मिळावी अशी केली प्रार्थना
पालखी सोहळ्यात दरवर्षी त्या आवर्जून दर्शन घेत असतात. (Dr. Nilam Gorhe News) आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी, “सर्व समाजातील घटकांना समृध्दी आणि प्रगतीची संधी मिळावी”, असे त्या म्हणाल्या. या दोन्ही ठिकाणी त्यांनी उपसभापती पदाच्या कार्य अहवालाच्या प्रती अर्पण केल्या.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, (Dr. Nilam Gorhe News) संजय मोरे, निवडुंगा विठोबा मंदिर विश्वस्त नगरसेवक विशाल धनवडे, रवींद्र पाध्ये, शिवसेना उपशहर संघटक राजेंद्र शिंदे, उपविभागप्रमुख राहुल जेकटे, महिला आघाडीच्या स्वाती ढमाले,ज्योती चांदेरे, प्रा. विद्या होडे, दिपाली राऊत ,संगीता भिलारे आणि मोठ्या संख्येने वारकरी बांधव उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बिनव्याजी कर्जाच्या बहाण्याने तिघांना गंडा घालणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या