उरुळी कांचन, (पुणे) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन सेवा निवृत्त लष्कर अधिकारी पी. बी. देशमुख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, संस्थेचे सचिव सोपान कांचन, राजाराम कांचन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात नर्सरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांच्या आयुष्यातील आईचे स्थान व आजच्या पालकांनी शिक्षकांचा सन्मान करण्याचा मौल्यवान संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, “समृद्ध भारत” या विषयावर नाटक, नृत्य, भाषण अशा अनेक कार्यक्रमातून मुलांनी त्यांचे कला गुण दाखविले. या संमेलनाचे आकर्षण म्हणजे इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी चांद्रयान-3 चे कार्यरत मॉडेल तयार करून प्रात्यक्षिक कार्यक्रमात प्रक्षेपित केले. हे मॉडेल तयार करण्यासाठी शाळेचे विद्यार्थी श्रीजीत कांचन, रुद्र पवार, अवधूत शिवरकर, आदेश बागल आणि नैतिक लुंकड यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.