उरुळी कांचन (पुणे) : येथील पांढरस्थळ परिसरातील जिल्हा परिषद शाळेला नांदूर (ता. दौंड) येथील फिल्ट्रम फायबर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून विविध किमती वस्तू देण्यात आल्या. लोखंडी कपाट, टेबल, खुर्च्या व इतर काही वस्तू सी.आर.एस. फंडातून देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी दिलेल्या वस्तू शाळेच्या मुख्याध्यापक, वैशाली खामकर, रंजना खेडेकर, जैबून बागवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारून कंपनीतून आलेल्या सहकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन केल्याचे मत कंपनीचे मुख्य व्यवस्थापक योगेश माने व सचिन मस्ती यांनी व्यक्त केले. या वेळी युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रताप कांचन, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी कंपनीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.