दीपक खिलारे
इंदापूर : धायगुडेवाडी परिसरातील विद्युत जनित्र (डी.पी.), रस्ता आदी प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी केले. अकोले गावातील धायगुडेवाडी येथे ओपन जिमचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी युवकांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
अकोले-धायगुडेवाडी परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. प्रास्ताविक रमेश धायगुडे यांनी केले. या वेळी उपसरपंच गणेश खाडे, माजी उपसरपंच भाऊसाहेब पडळकर, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य एस. के. शिंदे, ज्ञानदेव कोकरे, माने गुरुजी, राजेंद्र कोकरे, लाला कोकरे, बाबू कोकरे, विष्णू कोकरे, मच्छिंद्र सोलनकर, विकास कोकरे, सुरेश कोकरे, महादेव धायगुडे, संपत धायगुडे, संजय धायगुडे, शरद धायगुडे, मनोज कोकरे, मल्हारी सोलनकर, संभाजी धायगुडे, अजित सोलनकर, संभाजी पडळकर आदींसह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
वेळापत्रक कितीही व्यग्र असले, तरी व्यायामासाठी वेळ देणे गरजेचे आहे. निरोगी शरीरासाठी व्यायाम गरजेचा आहे. तंदुरुस्त शरीर हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे ओपन जिमचा लाभ घ्या, असे आवाहन या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.