राजू देवडे
लोणी धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त धामणी ग्रामस्थांच्या व पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खंडोबाची महाआरती करुन दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी देवस्थानाचे सेवेकरी भगत, तांबे, वाघे, वीर मंडळींसह दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, प्रभाकर भगत, राजेश भगत, राहूल भगत, पोपट विधाटे, दगडू करंजखेले, बाबुराव सोनवणे, अरुण बोर्हाडे, विजय चिखले, ओंकार भुमकर आदी उपस्थित होते.