-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यामध्ये (दि. 24 जुलै) रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. याच अतिवृष्टीचा फटका पुरंदर तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या कोडीत गावाला झाला. या अतिवृष्टीमुळे कांदा, भात, भुईमूग, घेवडा यासह इतर आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यासंदर्भात कोडीत गावच्या सरपंच रंजना खुटवड यांनी तहसीलदार तथा तालुका कृषी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, असे पत्रात नमूद करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गौरव भोसले, शिवसेना नेते योगेश खुटवड, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बडदे, मनोज जरांडे उपस्थित होते. खुटवड यांनी दिलेल्या पत्रामध्ये असेही नमूद केले आहे की, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन सदरील पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.
मात्र पत्र व्यवहार करून देखील संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून पंचनामे अद्यापही सुरू नाहीत, अशी भावना सरपंच रंजना खुटवड यांनी व्यक्त केली आहे,