लोणी काळभोर : Fursungi News : फुरसुंगी (Fursungi) व लगतच्या भागाला सोयीचे होईल. असे नवीन पोलीस ठाणे फुरसुंगी (ता. हवेली) (Fursungi New) येथे (separate-police-station-at-fursungi)उभारण्यात यावे. अशी मागणी भाजपाचे मध्य हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे (madhya-haveli-taluka-president-of-bjp-dhananjay-kamthe )व युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप परदेशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पोलीस आयुक्त (commissioner-of-police) रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. (Fursungi New)
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर राजा यांना निवेदन
धनंजय कामठे व संदीप परदेशी यांनी या मागणीचे निवेदन विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर राजा (deputy-commissioner-of-police) यांना नुकतेच दिले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही मागणी पत्राद्वारे केली आहे.
हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत फुरसुंगी चौकी आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा फुरसुंगी व भेकराईनगर हा मोठा परिसर आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा उरुळी देवाची हा मोठा परिसर आहे. या परिसरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे गेल्या कांही वर्षापासून फुरसुंगी व आपसापच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे.
वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत चाललेली गुन्हेगारी यांस आळा घालण्याकरिता पोलीसबळ अपूरे पडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे फावते व पोलीस कुमक पोहचण्याआधीच गुन्हेगार पसार होतात. या सगळ्या गोष्टीमुळे स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फुरसुंगी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस असणे ही काळाची अत्यंत गरज झाली आहे.
दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी फुरसुंगी, भेकराईनगर व उरुळी देवाची या गावांचा एकत्र समाविष्ट करून फुरसुंगी येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे. यासाठी भाजपा मध्य हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे व युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप परदेशी यांनी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे केली आहे.