काळेपडळ: पुण्यात गुन्हेगारी चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे येथील काळेपडळ येथे कोयत्याचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याचा कडचा ऐवज आणि मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 मार्च रोजी मध्यरात्री एका वाजण्याच्या सुमारास ही घटना सय्यदनगर येथे घडली आहे. दरम्यान, सराईत गुन्हेगारांनी लाकडी दांडक्याने ज्येष्ठ नागरिकाला जुन्या भांडणाच्या कारणावरुन मारहाण करुन परिसरात दहशत पसरविली. याबाबत उमर शकील शेख (वय २१, रा. मोहमंदवाडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, नोमान आरिफ सय्यद (वय २०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या सराईत गुन्हेगाराला या प्रकरणी अटक केली आहे. नोमान आरिफ सय्यदवर यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी कारवाई करत नोमान आरिफ सय्यद आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून एक साथीदार सध्या फरार आहे.
फिर्यादी हे झेप्टो अॅपवरुन स्वीकारलेली आईस्किमची डिलेव्हरी देण्याकरीता मोटारसायकलवरुन जात असतांना फिर्यादीला आरोपींनी अडवले आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल व 630 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपी धारदार शस्त्राचा धाक दाखवून असे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी डिलेव्हरी बॉयवर कोयत्याने वार करून त्याला जखमी करण्यात आले आहे. सय्यदनगरमध्येही हे गुन्हेगार शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांना लुटत आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करीत आहेत.