Pune: पुणे शहरात नागरिक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. दरम्यान, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष मोहीम राबवल्या जात आहेत. दरम्यान, या मोहिमे अंतर्गत अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे, दुकाने, गाळे, टपरी व घरे काढण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमण मोहीम पूर्ण करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील कारवाईमध्ये 3 ते 13 मार्चपर्यंत 2500 पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई करत अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्यातील अतिक्रमण मोहीम उद्यापासून सुरु होणार असून 17 ते 30 मार्चदरम्यान चालणार आहे. नागरिकांनी केलेल्या अतिक्रमामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहेत. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई केली जात असून अनेक मोठ्या इमारती आणि दुकाने पाडण्यात येत आहेत.

अतिक्रमण मोहीमचे वेळापत्रक
१) नवले ब्रिज ते सारोळे – मार्च 17 ते 30

२) सुस रोड – मार्च 17 ते 30

३) तळेगाव,चाकण, शिक्रापूर -मार्च 17 ते 30
४) नवलाख उंब्रे ते चाकण – मार्च 17 ते 30
५) शेवाळवाडी ते दिवे घाट – मार्च 17 ते 30
६) हिंजवडी परिसर, माण – मार्च 17 ते 30
पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एमएसईबी आदी विभागांमार्फत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.







