Dehu News : देहूगाव : आषाढी वारीची प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदी स्वच्छ करणे, पालखी मार्गावरील राडारोडा उचलणे, अतिक्रमणे काढणे आदी कामे करण्याच्या सुचना अपर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी दिल्या आहे. देहू नगरपंचायतीला वारकऱ्यांची गैरसोय होणार यासाठी या कामांचे आदेश देण्यात आले आहेत. (Preparations for Vari speed up in Dehu; Many works have been undertaken to avoid inconvenience to the workers)
10 जून रोजी प्रस्थान होणार
पुढील महिन्यात पालखी सोहळ्याचे दि. 10 जून रोजी प्रस्थान होणार आहे. (Dehu News ) त्यामुळे अवघ्या 20 दिवसांवर हा सोहळा येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सोहळ्याचे नियोजन आढावा आणि पालखी महामार्गाची पाहणी संदर्भात मुख्य मंदिराच्या कार्यालयामध्ये बारा दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी संजय असवले यांनी बैठक घेतली.
प्रशासनाकडून पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली त्यावेळी अनेक बाबी समोर आल्या त्यामध्ये बांधकामामुळे रस्त्यांवर पडलेला राडारोडा, पदपथांसह रस्त्यावर होणारे अतिक्रमण, इंद्रायणी नदी पात्रामध्ये जलपर्णी, कचरा, निर्माल्य, रसायन मिश्रित दूषित पाणी, सांडपाणी असल्याचे दिसून आले आहे. (Dehu News ) तर दूषित पाण्यामुळे मासे मृत होत आहेत. ही बाब गंभीर असल्याने संबंधित विभागाला त्वरित कारवाई करण्याचे आदेश अपर तहसीलदार डॉ. निकम यांनी देहू नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे दिले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Collector Visited Palkhimarg : वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये : जिल्हाधिकारी