Dehu News : देहू : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये सुरू झाला. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरकडे तुकोबांच्या पालखीने प्रस्थान ठेवले आहे. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. (Departure of Jagadguru Sant Tukaram Maharaj’s palanquin to Pandharpur; Warkari Harinamat Dang)
हजारो भाविक देहूत दाखल
टाळ- मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. (Dehu News ) शनिवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते.
आज सकाळी देखील इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं. पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली. (Dehu News ) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, हर्षंवर्धन पाटील, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ- मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून दिल्याचं पाहायला मिळालं. फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Dehu News : देहूमध्ये वारीच्या तयारीला वेग; वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक कामे घेतली हाती
Dehu News| देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे ; उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव…!