शिक्रापूर: दहिवडी (ता. शिरुर) येथील परिसरामध्ये एक इसम बेवारसपणे फिरत असताना सदर इसम आजारी असल्याने नागरिकांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. या इसमावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी त्या इसमाची माहिती घेतली असता काहीही माहिती मिळून शकली नाही.
सदर इसमाचे वर्णन (वय ५०), रंग सावळा, काळे केल, कपाळावर जुने व्रण, उभट चेहरा, छातीवर नेहा, सोनू, रुक्सार असे तसेच डाव्या बाजूला इअ, हाताच्या दंड व पाठीवर ओम व त्रिशुल असे गोंधलेले आढळले, तर याबाबत पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर इसामाबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप इथापे हे करत आहे.