संदीप टूले
Daund News : दौंड, (पुणे) : एकेरीवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत गरीब शेतकरी सावकार शंकर जगताप या शेतकऱ्याच्या डौलदार ‘दोडका’ पिकावर अज्ञात व्यक्तीने टू फोअर डी नावाचे तणनाशक फवारले आहे. त्यामुळे जोमदार दोडक्याचे पीक उध्वस्त झाले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Daund News
दौंडसह परिसरात दोडक्याला बाजारभाव मिळत आहे. दौंड सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने आधीच शेतकरी राजा चिंतेत असून कशी बशी पीक जगवण्यासाठी धडपड करत असून दोन चार पैसे या पिकातून मिळवण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन पिक चांगले आणण्यासाठी भरमसाठ खर्च करत असतो. त्यातूनच चांगले दोडका पिक जोमदार आणले होते. Daund News
शेतकऱ्याची दिवसाला जवळपास १० कॅरेट दोडका निघत होता, दोन चार पैसे या शेतकऱ्याला मिळू लागले होते पण या समाजकंटकाला हे पहावले नाही. जगताप कुटुंबीय कधीच कोणाच्या अध्यातमध्यात नसते. तुटपुंजी जमीन तीच पिकवून आपला उदरनिर्वाह करतात. अशातच सावकार जगताप यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अत्यल्प भूधारक शेतकरी असलेल्या या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने त्यांच्या पिकावर तणनाशक फवारणी करणा-या चा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत बोलताना शेतकरी सावकार जगताप म्हणाले, “दोडका पिकाला पावसाने ओढ दिल्याने चांगला बाजारभाव मिळू लागला आहे. हे सदर समाजकंटकाला पहावले नाही. झालेला प्रकार खूप निंदनीय आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. माझ्या बाबतीत हा प्रकार घडला दुसऱ्या कोणा बाबतीत घडू नये अशी यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसानी याचा तपास करुन दोषींवर कारवाई करावी.”