Daund News : दौंड, (पुणे) : लोणी काळभोर येथून सोलापूरकडे गुळ घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघातात झाला. या अपघातात वाहनचालकाचा गुळाच्या ढेपेखाली गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. २७) सकाळी ही घटना कुरकुंभ परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. या घटनेत सोबत असणारी व्यक्ती दूरवर फेकली गेल्याने किरकोळ जखमी झाली.
पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभनजीक घटना; एक किरकोळ जखमी
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राधेश्याम देवराम वानखेडे (वय २५, रा. कमलापूर, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Daund News) लोणी काळभोर येथून गुळ भरून बार्शीकडे जाताना कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील इटीपीच्या वळण परिसरात हा अपघात झाला. वाहन वेगात धडकल्याने दोन तीन वेळा उलटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वाहनचालकाला आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान, सकाळी गुळाच्या ढेपेची गाडी पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिकांनी मिळेल तेवढा गूळ पळवला. उशिरा येणाऱ्या काही नागरिकांच्या हाताला काहीच न लागल्याने त्यांची निराशा झाली.
दरम्यान, संपूर्ण गाडी रिकामी झाली.(Daund News) गुळ पळवणाऱ्या नागरिकांमुळे महामार्गावरील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जिवापेक्षा गुळ महत्वाचा झाल्याचे दुर्दैवी चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राजेगाव परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…