राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : दौंड शहरात मंजूर केलेला कत्तलखाना तत्काळ रद्द करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज आदी संघटनांनी निवेदनाद्वारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची दौंड येथे भेट घेतली. (Daund News) या वेळी भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी दौंड शहरात भाजप सरकारकडून मंजूर करून आणलेला नविन शासकीय यांत्रिक कत्तलखाना तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.
कत्तलखाना तत्काळ रद्द न झाल्यास हिंदू समाज रस्त्यावर उतरणार
दौंड तालुक्यातील तसेच पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील तमाम हिंदू धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या भीमा नदीलगत व श्री क्षेत्र सिद्धटेक गणपतीलगत दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी २०१९ च्या भाजपा सरकारकडून सर्वात मोठा शासकीय यांत्रिक कत्तलखाना मंजूर केला. विशिष्ट समाजाच्या फायद्यासाठी हा कत्तलखाना बांधला जात आहे. या कत्तलखान्यास हिंदू धर्मियांचा तसेच जैन, शिख, बौद्ध व वारकरी संप्रदायाचा कडाडून विरोध आहे. नव्या कत्तलखान्यात म्हशी कापल्या जातील सांगितले जात असले, तरी या कत्तलखान्यात किंवा आसपास देशी गोवंशाची हत्या व तस्करी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. (Daund News) दौंड परिसरात देशी गोवंश हत्या व गोमांस तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून, यावर कायदेशीर कारवाई देखील झाली आहे. शासकीय नियमानुसार बारामतीत कत्तलखाना असताना, जवळपास अंतरावर कत्तलखान्यास मंजुरी देता येत नाही, त्यामुळेच हा कत्तलखाना बेकायदेशीर पद्धतीने मंजूर करण्यात आला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
दौंड शहरात व आसपास राहणाऱ्या नागरिकांची मते विचारात घेतली गेली नाहीत व आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची मते किंवा हरकती मागितल्या नाहीत, असे प्रमुख मुद्दे मांडले निवेदनात मांडले असून, तमाम हिंदू समाज कत्तलखान्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. (Daund News) दौंडसारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत कत्तलखाना आणणे हा भाजपा आमदार राहुल कुल यांचा अट्टाहास कितपत योग्य आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र भाजपाने गोवंश हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात केला व हिंदू धर्मावर व गोमातेचे रक्षण करण्यासाठी मोठे पाऊल उचलेले त्याबद्दल अभिनंदन आहे; (Daund News) परंतु याच सरकारने व आमदारांनी दौंडमध्ये कत्तलखाना मंजूर करणे हे योग्य नसून, सकल हिंदू समाजाचा याला प्रखर विरोध आहे. कत्तलखाना तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा हिंदू समाज या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करून रस्तावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व दिले पाहिजे – माजी आमदार रमेश थोरात..
Daund News : दशक्रिया घाटांवर वाढतेय नेत्यांची भाषणबाजी; श्रद्धांजलीच्या नावाखाली जोरदार प्रचार
Daund News : कावळ्यांची काव… काव दुरापास्त; पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनात!