Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दशक्रिया घाटांवर वाढतेय नेत्यांची भाषणबाजी; श्रद्धांजलीच्या नावाखाली जोरदार प्रचार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 October 2023, 17:12

संदीप टूले

Daund News : केडगाव : दौंड तालुक्यात सर्वत्र सुसज्ज असे दशक्रिया घाट तयार केले आहेत. मात्र, येऊ घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावांत होणारे दशक्रिया विधी भाषणबाजीची केंद्रे बनू लागली आहेत. मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने झोडल्या जाणाऱ्या भाषणांमुळे हे घाट आता राजकारण्यांच्या मतपेटीचे अड्डे बनू लागले आहेत.

 

दशक्रिया घाट राजकारण्यांच्या मतपेटीचे अड्डे

दशक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधून या प्रकाराबाबत नाराजीचा सूर निघत आहे. तालुक्यातील कोणत्याही गावात बहुतांश दशक्रिया विधी कार्यक्रमात श्रद्धांजली वाहणाऱ्यांची संख्या १० ते १५ हून कमी नसते. एवढ्या मोठ्या संख्येने भाषणाद्वारे श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांची संख्या असेल तर उपस्थितांची किती गैरसोय होत असेल, याचा भाषण झोडणाऱ्यांना विसर पडतो. (Daund News) त्यातही सकाळी ९ वाजेपर्यंत उन हलके असते. त्यानंतर मात्र उन्हात बसलेल्या श्रोत्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.

अनेकदा ही मंडळी वेळेचे भान न बाळगता श्रद्धांजलीच्या नावाखाली लांबलचक व रटाळ भाषणबाजी करतात, जणू काही त्यांची आणि विरोधकांची लांबलचक भाषणांची स्पर्धाच लागलेली आहे असे चित्र दिसते. यामुळे दशक्रियेला उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाचा वेळ नाहक वाया जात आहे. घाटावर आलेली बहुतांश मंडळी शेतकरी, मजूर, नोकरदार व नातेवाईक असतात, ज्यांना लवकरात लवकर आपल्या कामावर हजर व्हायचे असते. पण याचेही भान बोलण्याच्या नादात या बोलघेवड्या मंडळींकडून ठेवले जात नाही. (Daund News)

सकाळी ८ वाजता सुरू होत असलेले दशक्रिया विधी पुढाऱ्यांच्या भाषणबाजीमुळे कमीत कमी १० ते ११ वाजेपर्यंत लांबतात. यात गैरहजर असलेल्या लहान-मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन, मी त्यांच्या फार जवळचा आहे, असे दाखवत त्यांच्या वतीने शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांची जणू स्पर्धाच लागलेली असते.

काकस्पर्श होईपर्यंत श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलणे अपेक्षित असताना, काकस्पर्श झाल्यानंतरसुद्धा तासभरापेक्षा जास्त वेळ या मंडळींची भाषणबाजी सुरूच राहते. (Daund News) दशक्रियेच्या निमित्ताने जमलेल्या आयत्या गर्दीचा भाषणबाजी व प्रसिद्धीसाठी या मंडळींकडून वापर केला जातो. परंतु, मृत व्यक्तीच्या जीवनमानाबद्दल काहीही माहिती नसतानासुद्धा ही मंडळी मृत व्यक्तीऐवजी दुसऱ्याच गोष्टीचे भाषणे ठोकतात.

या सभेत राजकीय विरोधकांची उणी-दुणी काढण्याचे व टोमणे मारण्याचे किस्सेही तालुक्यातील अनेक दशक्रिया घाटावर उकरले जातात. यातून दशक्रिया विधीघाटाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर होऊ लागल्यासारखे वाटत आहे. या भाषणबाजीमुळे दशक्रिया विधीचा मूळ उद्देशच दुर्लक्षिला जात आहे. (Daund News) त्यातून वेळेचे भान न पाळल्याने विधीचे पावित्र्यसुद्धा हरवले जात आहे.दशक्रिया विधीवेळी कुटुंबाचे सांत्वन कमी प्रमाणात व भाषणबाजी जास्त, अशी स्थिती दिसून येत आहे. ही पडलेली प्रथा कुठेतरी थांबली पाहिजे….

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : कावळ्यांची काव… काव दुरापास्त; पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनात!

Daund News : वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, शिवीगाळ

Daund News : जीवा महाले यांची निष्ठा प्रत्येकाने अंगिकारावी; जीवा सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश साळुंखे यांचे आवाहन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post
five common early dating mistakes you must avoid

लोक डेटिंगच्या सुरुवातीलाच 'या' चुका करतात, म्हणूनच राहतात सिंगल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.