गणेश सुळ
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पारगाव सा. मा. व केडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यावेळी पारगाव येथील ग्रामपंचायतीसाठी सदस्यसंख्या सतरा व जनतेतून सरपंच एक अशा १८ जागेसाठी जवळपास ७७ अर्ज दाखल झाले आहेत. तर केडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १७ व ६ वार्डमधून सदस्यपदासाठी १०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पारगाव येथे ७७ तर; केडगाव येथे १०१ उमेदवारी अर्ज दाखल
पारगाव येथे निवडणुकीत समोरासमोर तीन पॅनेल उभे ठाकल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. त्यामुळे येणार्या काही दिवसात निवडणुकीचे वातावरण गरमागरम होणार हे आता नक्की झाले आहे. केडगाव व पारगाव ही दोन्ही गावे दौंड तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने या निवडणुकीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Daund News) या दोन्ही गावच्या मतदानामुळे विधानसभेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या उमेदवाराची समजूत काढणे देखील मोठे आव्हानात्मक असणार आहे, असे मत लोकचर्चेतून समोर येत आहे. मात्र, या निवडणुकीच्या आखाड्यामुळे लाखो रुपयांची कर वसूली देखील झाली.
पारगाव ग्रामपंचायतीत जवळपास 6 हजार 694 मतदार असून, त्यापैकी 3 हजार 300 महिला मतदार असून, 3 हजार 394 पुरुष मतदार आहेत. (Daund News) गावात सहा प्रभाग असून, सतरा सदस्य, तर अठरावा जनतेतून सरपंच असे संख्याबळ आहे. अर्जाची छाननी 23 ऑक्टोबर, तर मागे व चिन्हवाटप 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 6 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : यवत पोलीस स्टेशनवर गोरक्षकांचा ‘चिल्लर फेक’ मोर्चा; पोलीस प्रशासनाचा निषेध