गणेश सूळ
Daund News केडगाव : महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नव संकट उभ राहिलं आहे. शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबून टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. परंतू त्याच पिकाने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. (Farmer Havaldil! The farmer’s eyes are watering as the tomato crop is not getting the price)
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी टोमॅटो पिकाने अडचणीत आला आहे. त्याच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने मार्केटमधून बाहेर येताच अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावरच फेकून दिल्याचे पहायला मिळाले. (Daund News) शेतकरी, कष्टकरी वर्ग आक्रमक भूमिका घेत आहे, परंतू त्यांच्याकडे लक्ष द्यायला किंवा त्यांच्या प्रश्नावर विचार करायला सरकारकडे वेळ नाही.
शेतकऱ्याच्या आशेवर पाणी
पुणे जिल्ह्यात टोमॅटो पिकाची लागवड मोठया प्रमाणात झाली होती. या टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरले आहे. (Daund News) बाजारात या टोमॅटोची विक्री ३ ते ४ रुपये दराने होत असल्याने शेतकरी वर्गातुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच हजारो टन टोमॅटो फेकून दिली आहेत. काहींनी तोडणी बंद केली.
टोमॅटोची लागवड करताना शेतकऱ्यांना मशागत, रोपे, लागवड, तार, काठी, सुतळी, बांधणी, तोडा यादरम्यान लाखो रुपयांचा खर्च येतो. आताच्या सध्य परस्थितीत शेतातून टॉमेटो बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना मालवाहू टेम्पोच्या भाड्या येवढे पैसे शेतकऱ्यांना मिळेनात. “तोंडाला पाणी पुसणे” या म्हणीप्रमाणे हा जगाचा पोशिंदा उपाशी पोटी बाजारातून माघारी येत असताना पहावयास मिळत आहे. (Daund News) तोडणीसाठी लावलेल्या मजुरांचे पैसे देण्यासाठी शेकाऱ्यांकडे पैसे नाहीत. जगावे की मरावे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाऊन काळात अनेक उभी पिके शेतात गाडून टाकली होती. त्या काळात मेटाकुटीला आलेला शेतकरी टॉमेटो पिकाला कमी भाव मिळत असल्याने चिंताग्रस्त झाला आहे. घरातील महिला, पुरुष, लहान मुलं रात्र – दिवस शेतात कष्ट करूनही शेतकऱ्यांना फळ मिळत नाही. शेतकरी वर्गासाठी कोणी वालीच नाही. (Daund News) सगळे केलेले कष्ट मातीत चालले आहे. मुलांच्या अत्ता काही दिवसात शाळा चालू होतील त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा या पिकातून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु त्यावरही पाणी पडले. शेती सोडून द्यायची वेळ आली आहे.
दरम्यान, सर्व देश शेतकऱ्याच्या जीवावर आहे. शेतकरी जर मेला तर अन्न – अन्न करून मरावे लागेल. सरकारने शेतकऱ्याचा हिताची धोरणे राबवावित शेतकऱ्याकडे लक्ष केंद्रित करावे. या फेकून दिलेल्या टोमॅटोची नुकसानभरपाईची कोण देणार असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे. (Daund News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : कापडी पिशव्या वापरा, पर्यावरण वाचवा : भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे
Daund News : “अमृत भारत” योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास