Daund News : दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस (ता. ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टोल प्लाझा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका वाहन चालकाला बेदाम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा जणांवर गुन्हा दाखल!
सुभाष उर्फ विकास ज्ञानोबा कड (वय ४८, सोरतापवाडी, ता.हवेली, जि.पुणे) असे या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. तर सचिन विठ्ठल माकर, सौरभ माकर, अक्षय राजेंद्र भंडलकर, आनंद माकर, भैय्या शितकल (सर्व रा.पाटस, ता.दौंड, जि.पुणे) व ज्ञानेश्वर राशनकर (सध्या रा. वरवंड, ता.दौंड, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष कड हे त्यांच्या कामानिमित्त पुणे सोलापूर महामार्गावरून चालले होते. त्यांची गाडी पाटस टोलनाक्यावर आली असता, त्यांच्या वाहनांचा टोल कट झाला. (Daund News) त्यांनी याबाबत विचारणा करण्यासाठी व कट झालेले पैसे परत मागण्यासाठी टोल नाका येथील कर्मचाऱ्यांकडे गेले.
दरम्यान, टोल कर्मचारी सचिन माकर याने टोल कट झाला असेल तर मी काय करू. तुला काय करायचे ते कर असे म्हणुन सुभाष कड यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. (Daund News) तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली.
त्यानंतर आरोपी सचिन माकर याने तीन – चार जणांना बोलावून घेतले. व कड यांना हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जवळील हॉकी स्टीकने डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. त्यांनी तत्काळ जखमी अवस्थेत पाटस पोलीस चौकीत धाव घेतली.
याप्रकरणी सुभाष कड आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील आरोपींच्या विरोधात जबर मारहाण करणे, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Daund News) पुढील तपास पोलीस हवालदार भानुदास बंडगर करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंडच्या पश्चिम पट्ट्यात अखेर पावसाची हजेरी
Daund News : ‘त्या’ खुनाचा व्हिडिओ असल्याचे सांगत पोलिसानेच केले ब्लॅकमेलिंग!
Daund News : राजेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे बिनविरोध