गणेश सुळ
Daund News : केडगाव: पंढरीची वारी आहे माझे घरी । आणीक न करी तीर्थव्रत ॥
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दि.15जून रोजी यवत येथिल काळभैरवनाथ मंदिरामध्ये येणार आहे. यानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी याठिकाणी भेट दिली. पालखी सोहळा येणार असल्याने आणि वारकऱ्यांसाठी भोजनाची तयारी सुरु असताना खासदार सुळे यांनी थेट चुलीपुढे बसून भाकरी थापल्या. तसेच पिठलंही हाटले.
सोहळ्याच्या व्यवस्थेचा खासदार सुळे यांनी घेतला आढावा
यावेळी सोहळ्याच्या व्यवस्थेचा खासदार सुळे यांनी आढावा घेतला. यावेळी वारकऱ्यांना घरच्या जेवणाची जेवणावळ मिळावी या हेतूने काळभैरवनाथ मंदीर परिसरात ज्वारी- बाजरी ची भाकरी व हटलेले बेसन बनविण्याचा स्वयंपाक चालू होता. हे पाहताच सुप्रिया सुळे यांना भाकरी थापण्याचा मोह आवरता आला नाही. (Daund News) त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी स्वतः त्या महिलाशी गप्पा मारत भक्ती थापल्या व आपल्या हातून नकळत भाविकांची सेवा केली.
सुळे भाकरी थापत असताना माझी आमदार रमेश थोरात यांनी देखील बेसन हटण्याचा आनंद सोडला नाही. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी अनोखी मदत करून वारकरी बांधवांची सेवा केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना सूप्रिया सुळे यांनी पाऊस पडून शेतकऱ्याच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत अशे साकडे पांडुरंगाकडे आहे अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत सुप्रिया सुळे दौंड तालुक्यातील बोरी फाटा या वेशीवर पालखीच्या स्वागतासाठी रवाना झाले. (Daund News) या प्रसंगी माझी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, तुषार थोरात, नितीन दोरगे, सदानंद दोरगे, कुंडलिक खुटवड, रोहन दोरगे, दिलीप दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; १६ गोवंशाची सुटका ..
Daund News : पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथे भीषण अपघात !