गणेश सुळ
Daund News : केडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.२७ जुलै) पीएम किसान योजनेचा १४वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. याचा फायदा साडेआठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला आहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर १४व्या हफ्त्याचे २ हजार रुपये जमा झाले नाहीत.
पीएम किसान योजनेसाठी सरकारकडून टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही १४व्या हप्त्याचे पैसे का आले नाहीत याची चौकशी करू शकता. तसेच तुम्ही या नंबरवर कॉल केल्यांनतर कृषी विभागाकडून तुमच्या खात्यावर रक्कम पाठवली जाऊ शकते. अशी चुकीची माहिती शेतकरी वर्गाला मिळत आहे.
टोल फ्री नंबरवर कॉल लागत नाही
जर तुमचीही पीएम किसान योजनबाबत काही शंका किंवा तक्रार असल्यास तुम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून त्याचे निवारण करू शकता. तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. तसेच सरकारकडून एक मेल आयडी देखील देण्यात आला आहे. त्यावर तुम्ही तुमच्या तक्रारीसह मेल करू शकता. अशी दिलेली माहिती साफ खोटी आहे.
कारण अद्याप या नंबर वर फोन लागताच नाही व दिलेल्या ईमेल मेल आयडी वर मेल केला असता अनेक महिन्यापासून रिप्लाय दिला जात नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गने पुणे प्राईम न्यूज शी बोलताना दिली आहे.
तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ४ दिवसानंतरही १४व्या हफ्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत.
काही वेळा आधार नंबर किंवा बँक खाते नंबर चुकीचा प्रविष्ट केल्याने खात्यात पैसे येत नाहीत. आणि आत्ता दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी यांच्याकडे संबंधित शेतकरी गेले असता आम्हाला अधीकार नाही असे साफ सांगितले जाते. कृषी अधिकारी यांचेकडे गेले असता आम्हाला पासवर्ड व आयडी मिळालेला नाही असे बोलले जाते. यामुळे शेतकरी वर्गाला फक्त नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, प्रशासनाने, सरकारने उपाय योजना आखणे गरजेचे आहे. शेतकरी वर्ग साठी हेल्पलाईन तक्रार केद्र स्थापन करावे अशी मागणी दौंड तालुक्यातील केडगाव, खुटबाव, देलवडी, पिंपळगाव, नाथ्चीवाडी, बोरीबेल, गाडेवाडी अशा अनेक गावातील शेतकरी वर्ग करत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मध्ये फक्त ४ हप्ते जमा झाले आहे. पुढील एकही हप्ता जमा झाला नाही. परंतु हप्त्याचे पैसे जमा होण्याच्या दिवशी पैसे जमाचा मेसेज येतो. परंतु, पैसे जमा होत नाही. मी संबंधित नंबर वर स्टेटस चेक करत असताना फोन लागताच नाही. तरी या योजनेसाठी गाव पातळीवर कॅम्प राबवावे व यासाठी जनजागृती करावी.
मनोज चोरमले (शेतकरी-नाथाचीवाडी)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यातील तरुणाईचा आमदार राहुल कुल यांना भक्कम पाठिंबा
Daund News : शिवाजी वांझरे यांनी स्वखर्चाने रस्त्यावर टाकला भराव – नागरिकांकडून कौतुक..
Daund News : पारगाव येथील एटीएम स्फोटकाच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न..