Daund News : दौंड, (पुणे) : दौंड रेल्वे स्थानकावर (Daund Railway Station) ३६ रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या (coming-south-should) काही गाड्यांना (be-stopped-at-daund-) दौंडमध्ये थांबा द्यावा, अशी (request) मागणी खासदार सुप्रिया सुळे ( mp-supriya-sules) यांनी रेल्वेमंत्री (railway-minister) आश्विनी वैष्णव यांच्याकडे ट्वीट करून केली आहे. (Daund News)
दौंड रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक
शिर्डी येथून अहमदनगरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना देखील दौंड हे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय बारामती, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा, फलटण, रांजणगाव, शिरवळ या परिसरात जाण्यासाठी वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतू आत्ता दौंड रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाड्यांमध्ये पुण्यातून चढावे लागत आहे.
वास्तविक या गाड्यांना दौंड येथे थांबा देणे आवश्यक आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी दौंड स्टेशनवर या सर्व गाड्या थांबणे खुप महत्त्वाचे आणि सोयीचे आहे. याशिवाय दौंड स्थानकावर या गाड्यांना थांबा दिल्याने पुणे स्थानकावरील प्रवाशांचा बोजा बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव आपणास विनंती आहे की कृपया दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांना दौंड येथे थांबा देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असं त्यांनी ट्विटमध्य़े लिहिलं आहे.
दरम्यान, सुळे यांनी वंदे भारत ट्रेनला दौंडमध्य़े थांबा देण्याची मागणी केली होती. ‘मुंबईहून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेसची सगळ्यांनाच आतुरता आहे. मात्र या मार्गावर असणाऱ्या दौंड या महत्वाच्या स्थानकावर थांबा न दिल्याने दौंडला थांबा द्या’, अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली होती. दौंड हे या मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसचा थांबा दौंडमध्ये देण्यात यावा, असं त्यांनी ट्वीट केलं आहे.