संदीप टुले
Daund News : केडगाव : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने आज हजेरी लावली. या पावसाने दौंड तालुक्यातील पश्चिम पट्टा ओलाचिंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिना पूर्णपणे पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली होती. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत होते.
बळीराजा सुखावला
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच वरुणराजाने यवत, केडगाव, सहजपुर, खामगाव, खुटबाव परिसरात कमी अधिक प्रमाणात का होईना हजेरी लावली आहे. दर वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात बाजरीची पेरणी केली होती. आषाढ महिन्यात पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, हा महिना पूर्णपणे कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या धूळपेरणीसाठी पावसाचे आगमन गरजेचे झाले होते. पण तसे झाले नाही. परिणामी, अनेकांनी शेताची नांगरणी करून तयार ठेवल्या होत्या. (Daund News) तसेच ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती. त्यांनी थोड्या फार प्रमाणात पेरण्या केलेल्या पण पावसाअभावी विजेचा पण लपंडाव सुरू होता. यामुळे हेही शेतकरी दुहेरी संकटात सापडले होते.
निव्वळ पावसावर अवलंबून असलेले शेतकऱ्यांच्या उगवलेल्या पेरण्या जळू लागल्या होत्या. हे शेतकरी पावसाची वाट मुलाप्रमाणे पाहत होते. (Daund News) अशातच शनिवारी सकाळीच अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे जरी पावसाचे आगमन झाले नसले, तरी शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे..
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : ‘त्या’ खुनाचा व्हिडिओ असल्याचे सांगत पोलिसानेच केले ब्लॅकमेलिंग!
Daund News : राजेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे बिनविरोध