राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्यातील पारगाव, कुरकुंभ, यवत व इतर अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
भाविकांची दर्शनासाठी गर्दी
यवत येथील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी नऊ दिवस विविध रुपातील आकर्षक पूजेची मांडणी करण्यात आली होती. (Daund News) घटस्थापना ते दसरा या कालावधीत देवीची भव्य मिरवणूक, जागरण-गोंधळ, जादूगार, होम मिनिस्टर, लावणी यासारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात आला.
गावातील श्री तुकाई माता मंदिर व श्री काळभैरवनाथ मंदिर येथे देखील पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. (Daund News) या वेळी केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरली. श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दसऱ्यानिमित्त श्री कालभैरवनाथांची पालखी काढण्यात आली. (Daund News) पालखीचे आगमन श्री महालक्ष्मी मंदिरात झाल्यानंतर देवीची आरती करून रावण दहन करण्यात आले व नवरात्र उत्सवाची सांगता झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राहू येथे एका रात्रीत ३ ठिकाणी घरफोडी; २ लाख १८ हजारांचा ऐवज लांबवला