संदीप टूले
Daund News : दौंड : दौंड जि. पुणे येथील कत्तलखान्यावर छापा टाकून १६ जनावरांची पोलीस आणि प्राणिमित्रांनी सुटका केली. जनावरांच्या चरबीपासून बनविलेले भेसळ युक्त तूप आणि जनावरांची कातडी जप्त केली.
या प्रकरणी शरीफ हसन कुरेशी (रा. दौंड, खाटीक गल्ली) याच्या विरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड येथे ईदगाह मैदान शेजारी खाटीक गल्लीतील कत्तलखान्याशेजारी जनावरे गोवंश कत्तलीसाठी ठेवले आहेत, अशी माहिती प्राणिमित्रांना मिळाली. त्यांनी पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांना ही माहिती दिली. (Daund News) प्राणिमित्र अधिकारी शादाब मुलाणी, मंगेश चिमकर, निखिल दरेकर, अहिरेश्वर जगताप, ओमकार जाधव, प्रेम पवार व इतर सहकारी यांनी दौंड पोलीस स्टेशनला महिती दिली.
जनावरांच्या चरबीपासून बनविलेले १०० किलो तूप जप्त
दौंड मध्ये खाटीक गल्ली येथे छापा टाकण्यात आला. १६ लहान मोठी वासरे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आली होती. १६ गोवंशाची सुटका करण्यात आली. आणि त्यांना भिगवण येथिल सहारा गोशाळत सोडून देण्यात आले. जनावरांच्या चरबीपासून बनविलेले १०० किलो बनावट डालडा तुप जनावरांची कातडी जप्त केली. (Daund News) जनावरांच्या चरबीपासून बनविलेले तुप नेमके कोठे, कोणाला आणि कशासाठी विक्री करत होते ? असे अनेक गंभीर गोष्टी उघड करणे पोलीसांच्या पुढे महत्वाचे असणार आहे.
पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व मानद पशुकल्याणचे अधिकारी महेश भंडारी यांनी विशेष सहकार्य केले. पुढील तपास अमीर शेख, रवींद्र काळे करीत आहेत
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथे भीषण अपघात !
Daund News : केडगाव : संतराज महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान