संदीप टूले
Daund News : केडगाव : दौंड रेल्वे स्थानक पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या जंक्शनपैकी एक असल्याने, या स्थानकाला विशेष महत्त्व आहे. या स्थानकावरून चारही दिशांना रेल्वे गाड्या जात असल्याने येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. यामुळे दौंड रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
आमदार राहुल कुल यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित
या वेळी दौंड रेल्वे स्थानकावर आमदार राहुल कुल यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील ५०७ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असून, यामध्ये दौंड रेल्वे स्थानकाचा देखील समावेश केल्यामुळे आमदार राहुल कुल यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
दरम्यान, दौंडच्या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण हे अमृत भारत योजनेतून करण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. (Daund News) त्यानंतर दौंड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याच माध्यमातून रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे, असे या वेळी राहुल कुल यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील स्थानकांचा विकास करण्यात येत असून, देशातील ५०७ तर महाराष्ट्रातील १२३ स्थानकांचा यात समावेश आहे. (Daund News) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतून रेल्वे स्थानकांच्या या विकासकामांचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, दिल्लीहून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांना पाहता यावा यासाठी दौंड स्थानकावर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. (Daund News) या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तरुण देखील उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : देलवडी गावच्या विकासकामांमुळे गावचा पायाभूत विकास होणार : माजी आमदार रंजना कुल
Daund News : गृहनिर्माण अभियंत्यांच्या संपामुळे शासनाची घरकुल योजना कोलमडली