संदीप टूले
Daund News : केडगाव : शेती करत असताना शेतीसाठी लागणारा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे पाणी होय. त्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे विहीर. बोर व त्याच्या निगडित अन्य पर्याय पण सध्या आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदकाम करू शकत नाही. परिणामी, पाण्याअभावी अशा शेतकरी बांधवांचे उत्पन्न कमी होत होते. म्हणून शासनाने मागेल त्याला विहीर हो योजना राबवली आहे.
अनुदान वाढवून आता झाले 4 लाख
शासकीय अनुदानावर विहीर खोदली तर नक्कीच शेतकऱ्यांना सहाय्य मिळणार असून, शेतकऱ्यांसमोरील अजून एक मोठी समस्या कमी होणार असल्यामुळे या योजनेचा चांगला फायदा होत आहे. (Daund News )पूर्वी सिंचन विहिरीसाठी ३ लाख अनुदान मिळायचे पण आता त्याची मर्यादा वाढविण्यात आली असून, ४ लाख एवढे अनुदान मिळत आहे. त्यामुळे विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी शेतकरी बांधवाना सोलर पंप देण्यात येत आहे. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तुषार ठिबक सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज?
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती.
भटक्या जमाती
नीरधीसूचित जमाती.
दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी.
स्त्री कर्ता असलेले कुटुंबे.
शारीरिकदृष्ट्या विकलांग कर्ताव्यक्ती तसेच ज्यांच्याकडे अडीच एकरपर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकरपर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
विहीर मंजूर होण्यासाठी अटी कोणत्या?
शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे. म्हणजे एक एकर जमीन असावी. ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे, त्या ठिकाणपासून ५०० मीटर अंतरावर दुसरी विहीर नसावी. लाभार्थीच्या सातबारावर अगोदरच विहिरीची नोंद नसावी. लाभार्थीकडे ऑनलाईन जमिनीचा दाखला असावा. (Daund News )लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० आर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. लाभार्थीकडे जॉब कार्ड असावे. ८ अ हा एकूण जमिनीचा दाखला तो देखील ऑनलाईन असावा.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना
ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्याना खूपच लाभदायक असून, ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा कुठलाच पर्याय नाही, त्यासाठी ही योजना नवसंजीवनी ठरत असून, शासन स्तरावर आम्हीही तळगळतील शेतकऱ्यांना कसा लाभ होईल. याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत.
– सौरभ साबळे, पंचायत समिती, दौंड (ए.पी.ओ.)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दौंडमध्ये स्वच्छता मोहीम
Daund News : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राजेगावात स्वच्छतेचा जागर
Daund News : दौंड तालुक्यात कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत जाहीर