संदीप टूले
Daund News : केडगाव : केमिस्ट बांधवांनो, तुम्ही फक्त ऑनलाईन, ऑनलाईन करत बसला तर तुमची दुकाने कधी बंद होतील याचा तुम्हालाही अंदाज येणार नाही. त्यामुळे ऑनलाईनची जाहिरात तुम्हीच करताय, तुम्ही फक्त तुमच्या दुकानाकडे नीट लक्ष द्या, दुकान अपडेट ठेवा, वेळच्या वेळी बिले करा, दुकान स्वच्छ ठेवा, ग्राहक हा तुमचा परमेश्वर आहे, त्याचा आदर करा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दिनेश खिवंसारा यांनी दिला.
‘जागतिक फार्मसिस्ट दिना’चे निमित्त साधून केमिस्ट बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दौंड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा चौफुला (ता. दौंड ) बोरमलनाथ मंदिर येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी दिनेश खिवसांरा, (Daund News) औषध निरीक्षक विजय नांगरे, पुणे जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत मोकाशी यांच्यासह तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या दौंड तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी नको तिथे लक्ष न देता आपल्या व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. कारण आपली एक चूक समोरच्याच्या जीवाशी संबंधित आहे. त्यामुळे कोणतेही औषध देताना त्याची पडताळणी करा, रोजच्या रोज बिले बनवा, (Daund News) मेडिकलमध्ये स्वच्छ्ता ठेवा, महत्वाचे म्हणजे केमिस्टच्या उपस्थितीमध्येच औषधांची विक्री करा. फ्रीजचा वापर करा, खरेदी-विक्री बिलांना अनुक्रमांक द्या, औषधे देताना चुकीची देऊ नका, असे औषध निरीक्षक विजय नांगरे यांनी सांगितले.
परवाने हे दर्शनी बाजूला लावावे
दिनेश खिवसरा म्हणाले की, केमिस्ट बांधवांनी दिलेली परवाने हे दर्शनी बाजूला लावले पाहिजे. शीतपेटीची औषधे शीतपेटीमध्येच ठेवली पाहिजे. वेळच्या वेळी कालबाह्य औषधे बाहेर काढली पाहिजे, ग्राहकांना बिले दिली पाहिजे. कारण बिल हा ग्राहकांचा हक्क आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सर्व केमिस्ट बांधवांसाठी भोजनाची सोय संघटनेने केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वाघोले यांनी केले. तर नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दिगंबर खराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रोहिदास राजपुरे व त्यांच्या टीमने दौंड तालुक्यातील केमिस्ट बांधवांसाठी खूप चांगले मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. असेच इतर तालुक्यातील कार्यकारिणी सदस्यांनीही मेळावे घ्यावे. (Daund News) याने नवनवीन प्रयोग अमलात आणून व्यवसाय कसा वाढवता येईल यासाठी भविष्यात नक्की फायदा होईल.
– भरत मोकाशी, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : अर्ध्या किंमतीत वस्तू देण्याचे आमिष; वरवंडच्या महिलेची ७ लाखांची फसवणूक; तिघांना अटक
Daund News : मराठा आंदोलकावरील हल्ल्याचे दौंडच्या ग्रामीण भागात तीव्र पडसाद ; उद्या निषेध मोर्चा..